Breaking News
Home / लाइफस्टाइल / किती दिवसात बेडशीट बदलले नाही तर आपण आजारी पडण्याची असते शक्यता

किती दिवसात बेडशीट बदलले नाही तर आपण आजारी पडण्याची असते शक्यता

दररोजच्या धावपळी मध्ये आपण लहानसहान कामे विसरतो किंवा त्यांना उद्यावर टाळतो. पण हीच टाळाटाळ आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. नंतर या समस्या मोठे रूप घेऊन आपल्या छोट्याश्या चुकीचे किंवा टाळाटाळ करण्याची मोठी किंमत आपल्याला द्यावी लागू शकते. जेवण्याच्या अगोदर हात धुणे, दिवसातून दोन वेळा ब्रश करणे, नियमित आपल्या कपड्याना धुणे आणि घराची स्वच्छता करणे या काही अश्या सवयी आहेत ज्यांना आपण योग्य प्रकारे अवलंबल्या तर आपण अनेक हेल्थ प्रॉब्लेम्स आपल्या पासून दूर ठेवू शकतो.

  • याच अनेक चांगल्या सवयी पैकी एक सवय आहे बेडशीट नियमित बदलणे. आपल्याला कदाचित ही अगदी सामान्य गोष्ट वाटत असेल किंवा तुम्ही याकडे गंभीरपणे देखील पाहत नसाल. पण बेडशीट नियमित बदलून त्यांना धुण्यामुळे आपण अनेक इन्फेक्शन आणि एलर्जी पासून वाचू शकतो. याबद्दलची अधिक माहिती आपण पुढे पाहूया.
  • आपल्या मनात प्रश्न आला असेल कि बेडशीट नियमित बदलणे म्हणजे किती दिवसा नंतर बेडशीट बदलणे योग्य असेल. तर एक्स्पर्टस लोकांच्या अनुसार एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ पर्यंत एक बेडशीट वापरण्यामुळे बैक्टीरिया आणि जर्म्स निर्मिती आणि त्यांच्या वाढीची भीती अनेक पटीने वाढते. त्यामुळे एक आठवड्याचा वेळ भरपूर आहे आणि सात दिवसा नंतर बेडशीट बदलून त्यास धुणे योग्य असते.

एक आठवड्यापेक्षा जास्त बेडशीट वापरल्याने फक्त इन्फेक्शन आणि एलर्जिक रिएक्शन होण्याची शक्यता वाढते असे नाही तर त्याच सोबत अंथरुणात वाढणारे किडे आणि ढेकूण यांचे ब्रीडिंग ग्राउंड देखील बनू शकते. त्यामुळे आपण बेडशीट सात दिवसानंतर बदलणे आणि त्यास धुवून सुकवणे योग्य राहील. यामुळे इन्फेक्शन आणि एलर्जिक रिएक्शन होण्याची शक्यता कमी होईल.

About admin