Breaking News
Home / लाइफस्टाइल / परिणीती चोप्रा फिल्म शूटिंग दरम्यान दुखावली, मानेला…

परिणीती चोप्रा फिल्म शूटिंग दरम्यान दुखावली, मानेला…

आता पर्यंत आपल्याला समजलेच असेल कि बैडमिंटन स्टार सायना नेहवालच्या जीवनावर आधारित बनत असलेल्या फिल्म मध्ये परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. परिणीती मागील अनेक दिवसा पासून बैडमिंटन सुपरस्टार सायना नेहवालच्या बायोपिकच्या शूटिंग मध्ये बीजी आहे. परंतु यादरम्यान परिणीतीच्या मानेला झालेल्या इजेमुळे शूटिंग थांबवावे लागलं. या फिल्म मध्ये सायना नेहवालच्या भूमिके मध्ये परिणीती चोप्रा दिसून येणार आहे. त्यामुळे तिची मुख्य भूमिका या फिल्म मध्ये असल्याने तिला इजा झाल्याने संपूर्ण फिल्मचे शूटिंग बंद करावे लागले आहे.

याबद्दलची माहिती अभिनेत्री परिणीती ने स्वतः सोशल मीडियावर फोटो शेयर करत दिली आहे. परिणीती ने लिहिले आहे कि मी आणि साइनाच्या पूर्ण टीम ने यागोष्टीकडे लक्ष दिले होते आणि सावधानी घेतली होती कि मी दुखापत ग्रस्त होऊ नये परंतु मी झालेच. सध्या मी आराम करत आहे आणि स्वतःला पुन्हा एकदा बैडमिंटन खेळण्यासाठी तयार करत आहे. परिणीती या फोटो मध्ये पाठ करून बसलेली आहे आणि मानेवर निळ्या रंगाचा बैंडेड लावलेलं आहे. डॉक्टरांनी तिला सध्या आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. आशा आहे ती लवकरच तंदुरुस्त होईल आणि पुन्हा फिल्म शूटिंगला सुरुवात करेल.

About admin