Breaking News
Home / राजकारण / उद्धव ठाकरे होणार नवे मुख्यमंत्री येथे होणार शपथविधी

उद्धव ठाकरे होणार नवे मुख्यमंत्री येथे होणार शपथविधी

मुंबई : उद्धव ठाकरे यांची निवड महा विकास आघाडीने केली आहे. तसा ठराव महा विकास आघाडी ने संमत केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा कार्यक्रम 1 डिसेंबर रोजी शिवतीर्थ म्हणजेच मुंबई मधील शिवाजी पार्क येथे होणार आहे.

राज्याचे हे नवे सरकार सामान्य जनतेच्या हितासाठी काम करेल अशी घोषणा उद्धव ठाकरे आणि इतर नेते मंडळींनी केली आहे. राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती बद्दल लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन देखी त्यांनी दिले आहे.

महाराष्ट्रात सत्तापालट केल्यानंतर शिवसेनेने आपला मोर्चा गोव्याकडे वळवला असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. तसंच लवकर गोव्यात राजकीय भूकंप होणार असून, चमत्कार दिसेल असा दावाही त्यांनी केला होता. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई आणि तीन मंत्री आपल्या संपर्कात असून शिवसेना नवी आघाडी निर्माण करुन भाजपा सरकार घालवणार असल्याचंही ते म्हणाले होते.

दरम्यान, राऊत यांच्या वक्तव्यानंतर २४ तासांच्या आतच गोवा सरकार पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील नसल्याचं गोवा काँग्रेसनं म्हटलं होतं. तसंच काँग्रेस सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करण्यापेक्षा विरोधी बाकांवर बसणं पसंत करेल, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली होती. गोव्यात ४० पैकी ३० आमदार हे भाजपाच्या बाजूनं आहेत. त्यामुळे सरकार पाडण्यापेक्षा आम्ही विरोधी बाकावर बसू, असं चोडणकर यावेळी म्हणाले. तसंच महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आश्वासनं तुम्ही पूर्ण करा. दिवसा-ढवळ्या स्वप्न पाहणं बंद करा, असा टोला भाजपा नेते विनय तेंडुलकर यांनी राऊत यांना लगावला होता.

संजय राऊत यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. राऊत म्हणतात, “गोव्यात भाजपाविरोधात आघाडी निर्माण करण्याच्या शिवसेनेच्या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक असल्याचे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे (एमजीपी) नेते सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे.”

About admin