Breaking News
Home / मनोरंजन / दीपिकाची सवत कोण? अर्जुन कपूरने केला खुलासा

दीपिकाची सवत कोण? अर्जुन कपूरने केला खुलासा

मुंबई : सध्या बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेतील आणि लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि रणवीर सिंग. बॉलिवूडचे हे बाजीवर-मस्तानी गेल्या वर्षी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्न बंधनात अडकले. हे कपल बऱ्याचवेळा त्यांच्या कामा व्यतिरिक्त कपड्यांच्या स्टाइलमुळे चर्चेत असतात. पण सध्या अभिनेता अर्जुन कपूरने दीपिकाची सवत कोण आहे याचा खुलासा केल्यामुळे ते चर्चेत आहेत. अर्जुन कपूर सध्या त्याचा आगमी चित्रपट ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’मध्ये व्यग्र आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या आणि रणवीरमध्ये असलेल्या मैत्रीबाबत वक्तव्य केले आहे.

‘माझी गाणी पाहिल्यानंतर रणवीर मला मोठमोठे व्हॉइस मेसेज पाठवतो. कधी कधी तर तो माझ्या गालावर किस देखील करतो. आमच्या मैत्रीवर कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. मी दीपिकालाही सांगितले आहे की मी तुझी सवत आहे’ असे अर्जुन म्हणाला आहे. काही दिवसांपूर्वी ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. संजय दत्त, अर्जुन कपूर, क्रिती सनॉन, पद्मिनी कोल्हापुरे, झीनत अमान, मोहनीश बहल अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये दिसणार आहे. भव्यदिव्य स्वरुपात गोष्ट मांडणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे चँलेंज सुरु असतात. अलिकडेच ‘बाला चँलेंज’ने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता ‘धिमे धिमे’ हे नवे चँलेंज चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने हे नवे आव्हान बॉलिवूड कलाकारांना दिले आहे.

कार्तिकने दिलेले हे आव्हान इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच अभिनेत्री दीपिका पदूकोण हिने देखील स्विकारले. परंतु हे आव्हान पूर्ण करण्यासाठी तिने कार्तिकचीच मदत मागितली आहे. दीपिका पदूकोण हिने अभिनेता कार्तिक आर्यनला ‘धिमे धिमे’ या गाण्याच्या डान्स स्टेप्स शिकवण्याची विनंती केली आहे.

About admin