in

रिसेप्शनसाठी दीपिका-रणवीर कुठे झाले रवाना, जाणून घ्या

काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यावर सध्या सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. हिंदी कलाविश्वात अत्यंत कमी वेळात प्रसिद्धी मिळवलेल्या या जोडीच्या आयुष्यात आलेलं हे वळण सध्या त्यांच्यावर आनंदाची उधळण करत आहे.

इटलीत पार पडलेल्या विवाहसोहळ्यासाठी दीपिका आणि रणवीरने फार कमी पाहुण्यांना आमंत्रण दिलं होतं. पण, लग्नाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्वागत सोहळ्यात म्हणजेच रिसेप्शनमध्ये तसं चित्र दिसणार नाही.

बंगळुरू आणि मुंबई येथे त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं असून, ही जोडी नुकतीच बंगळुरूला रवाना झाली आहे.

मंगळवारी सकाळीच या नवविवाहित जोडीला मुंबई विमानतळावर पाहण्यात आलं. यावेळी सुंदर अशा अनारकली ड्रेसमध्ये नववधू रुपातील दीपिकाचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं.

रणवीरही पांढऱ्या रंग्याच्या कुर्ता, पायजम्यात रुबाबदार दिसत होता. या पेहरावावर फ्लॉरल प्रिंट असणारं जॅकेटही त्याला शोभून दिसत होतं. मुख्य म्हणजे या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता.

दरम्यान, बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शन सोहळ्याला दीपिकाच्या मित्रपरिवाराचीही उपस्थिती असणार आहे. यानंतर ही जोडी पुन्हा मुंबईत दाखल होणार असून २८ नोव्हेंबरला मुंबईत आणखी एक रिसेप्शन पार पडणार आहे.

थंडी मध्ये होणाऱ्या आजारावर उपाय

कफ झाल्यास करा हे घरगुती उपाय