in

बॉलीवूडच्या या अभिनेत्रीना झाले दुसऱ्याच्या पती सोबत प्रेम आणि केले त्यांच्या सोबत लग्न

बॉलीवूडच्या जगामध्ये दररोज नवीन काहीना काही बातम्या येत असतात कारण तेथे दररोज काहीतरी नवीन घडत असते. कधी या बातम्या कोणाच्या तरी अफेयरची चर्चा असते तर कधी कोणाचे तरी ब्रेकअप असते. अश्या प्रकारच्या बातम्या नेहमीच बॉलीवूड मधून येत असतात.

बॉलीवूड मध्ये अश्या अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या सुंदरतेचे आणि अभिनयाचे लाखो लोक चाहते आहेत. पण तुम्हाला माहित आहे का कि या सुंदर अभिनेत्री दुसऱ्याच्या पतीच्या प्रेमात पडल्या आणि एवढेच नाही तर या सुंदर अभिनेत्रींनी दुसऱ्याच्या पती सोबत विवाह करून त्यांची दुसरी,किंवा अगदी तिसरीपत्नी देखील बनणे पसंत केले आहे.

शिल्पा शेट्टी

 

बॉलीवूडची ही एक सुंदर अभिनेत्री आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते हिने अनेक सुपरहिट चित्रपटा मध्ये काम केले आहे आणि सोबतच आपली स्वताची योगा प्रशिक्षणाची एक सीडी देखील प्रसिध्द केली आहे. शिल्पा शेट्टीने भारतातील प्रसिध्द बिजनेसमैन राज कुंद्रा सोबत विवाह केला आहे. शिल्पा शेट्टीला जेव्हा राज सोबत प्रेम झाले तेव्हा त्याचे पहिलेच लग्न झालेले होते. शिल्पा शेट्टी सोबत विवाह करण्यासाठी राज कुंद्राने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला त्यानंतर या दोघांनी विवाह केला.

रविना टंडन

बॉलीवूड मधील सगळ्यात सुंदर अभिनेत्री पैकी एक असलेली रविना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या अफेयर बद्दल बहुतेक लोकांना माहिती असेल. परंतु काही कारणास्तव यांचे एकमेकांच्या सोबत लग्न होऊ शकले नाही. रविना टंडनने अनिल थडानी सोबत लग्न केले ज्यांची अगोदरही एक लग्न झालेले होते आणि रविना सोबत लग्न करण्यासाठी ते आपल्या पहिल्या पत्नी पासून वेगळे झाले.

बिपाशा बसू

बॉलीवूडची अभिनेत्री बिपाशा बसूने टीव्हीचा लोकप्रिय स्टार अभिनेता करण सिंह ग्रोवर सोबत 2016 मध्ये विवाह केला. या आधी करणचा विवाह टीव्ही इंडस्ट्रीमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्री जेनिफर विंगेट सोबत विवाह झाला होता. जेनिफरही सुंदरतेच्या बाबतीत बिपाशा बसू पेक्षा एक पाऊल पुढेच आहे पण तरीही करण ने आपल्या तिसऱ्या विवाहासाठी जेनिफरला घटस्फोट दिला आणि बिपाशा बसू सोबत लग्न केले. करणच्या पहिल्या पत्नीचे नाव श्रद्धा निगम होते ती एक टीव्ही अभिनेत्री होती. दुसरी पत्नी जेनिफर होती तर तिसऱ्या पत्नीच्या रुपात करणच्या आयुष्यात बिपाशा बसू आली.

विद्या बालन

बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयासाठी प्रसिध्द असलेली विद्या बालनने सिध्दार्थ रॉय कपूर सोबत 14 डिसेंबर 2012 रोजी विवाह केला परंतु सिध्दार्थ रॉय कपूर अगोदर विवाहित होता आणि त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन विद्या बालन सोबत लग्न केले होते.

या 4 नावाच्या मुलींचा क्रोध असतो सगळ्यात भयंकर, यांच्या सोबत पंगा घेण्या अगोदर एकदा पुन्हा विचार करा

भेटा बॉलीवूडच्या या अभिनेत्रींना ज्यांचे वय लहान आहे, पण जलवे पाहून कोणीही प्रेमात पडेल