in ,

कफ झाल्यास करा हे घरगुती उपाय

काहींना कफची समस्या खूप भेडसावत असते. कफ जमा झाल्यावर अस्वस्था व्हायला होते. यावर वेळीच उपाय नाही केले तर श्वसना मार्गात संसर्ग होऊ शकतो. कफ जमा झाल्यावर काही समस्याना सामोरे जावे लागू जसे कि घसा चुकणे आणि छातीत दुखणें, काही वेळा अन्न गिळणे सुद्धा कठीण होऊ शकत.

भारतात खूप आजारांवर घरगुती उपाय केले जातात. हे उपाय अगदी साें असले तरी त्यांच्यात बरे करण्याची क्षमता असते शिवाय हे उपचार आरोग्यासाठी फायद्याचे असतात. आपण घरच्या घरी कोण कोणते उपाय करू शकतो ते पाहणार आहोत.

मध आणि लिंबाचा रस : एक ग्लास पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळा. असे पाणी दिवसातून दोन ते तीन वेळा प्या . मध हे नैसर्गिकरित्याच डीकंजेस्टंट आहे. शिवाय मधामुळे आणि छातीला आराम मिळतो, तर लिंबामदे सि जीवनसत्व असते त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

कोमट दुध : कोमट दुधात हळद, मध आणि थोडी काळी मिरी घालून प्यालास घश्याला आराम भेटतो. तसेचीचा संसर्ग आणि सर्दी कमी होण्यास मदत होते . हळद जंतुविरोधी असते आणि दाह कमी करण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे जंतू मरण्यास मदत होते तर काळी मिरी पचण्यास मदत करते शिवाय खोकलाही कमी होतो. दिवसातून हे मिश्रण दोन वेळा प्यावे .

कोमट पाणी : कोमट पाण्याने छातीला आराम भेटतो शिवाय भरलेली छाती मोकळी होण्मदत होते . पाणी प्याातीतील आणि श्वसनमार्गातील कफाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

गरम पाण्याच्या गुळण्या : कफाने भरलेल्या छातीसाठी हा एक घरगुती उपाय मानला जातो . एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा मीट घालून 2 ते 3 मिनिटे गुळण्या कराव्यात. गुळण्या करताना पाणी पिऊ नये. दिवसातून दोन वेळा तरी गुळण्या कराव्यात.

चहा प्यावा : आले किंवा पुदिना टाकून चहा घेतल्यास त्याचा खूप फायदा होतो. चहा आवडत नसल्यास नुसता आल्याचा तुकडा चघळला तरी चालेल.

वाफ घेणे : निलगिरी तेलाचे थेंब पाण्यात टाकून भरलेली छाती मोकळी करण्यास मदत होते. दीर्घ श्वास घेऊन निलगिरीची वाफ घेणे. चोंदलेले नाक आणि छाती मोकळी होण्यास मदत होते.

ब्लॅक कॉफी : काळी कॉफी प्याल्याने थोडा वेळचा आराम पडत असला तरी त्यामुळे कफ वीरगळण्यास मदत होते. दोन कप शिवाय जास्त कॉफी पियू नये , कारण कॉफीतील कॅफेन नावाचे घटक शरीरासाठी
चांगले नसते.

हळद : एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर हळद घालून गुळण्या कराव्यात. त्याकडे कुरक्युमिन नावाचा घटक असतो त्यामुळे कफ वीरगळण्यास मदत होते. भरलेली छाती मोकळी होते आणि आराम भेटतो.

कांद्याचा रस : खूप जणांना कांद्याचा तिकट वास आणि चव आवडत नाही , पण भरलेल्या छातीसाठी कांद्याचा रस हा एक उत्तम उपाय आहे. कांद्यातील क्यूरसेटिन कफ काढून टाकण्यास मदत करते . शिवाय कफ तयार होण्यास विरोध करते.

वरील सर्व उपाय नैसर्गिक असल्याने ते मूळ स्वरूपात असतात त्यामुळे ते कारण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

रिसेप्शनसाठी दीपिका-रणवीर कुठे झाले रवाना, जाणून घ्या

मिथुन चक्रवर्ती यांना मिळालेली कचराकुंडी जवळ ही मुलगी, आता बॉलीवूड मध्ये करणार डेब्यू