in

मिथुन चक्रवर्ती यांना मिळालेली कचराकुंडी जवळ ही मुलगी, आता बॉलीवूड मध्ये करणार डेब्यू

भारतीय समाजामध्ये कधी मुलाची अपेक्षा असताना मुलगी झाल्यावर तर कधी कधी अनैतिक संबंधातून झालेले आपत्य म्हणून त्या आप्त्याचा त्याग केला जातो हे वास्तव आहे. अश्याच एका प्रसंगाचा आपल्या काळातील सुपरस्टार असलेल्या मिथुन चक्रवर्ती यांचा सामना झाला. काही वर्षापूर्वी त्यांना एक मुलगी पश्चिम बंगालच्या एका रस्त्याच्या किनारी कचराकुंडी जवळ मिळाली. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना जेव्हा या मुली बद्दल समजले, तेव्हा त्यांनी त्यामुलीला वाचवण्याचा आणि स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सदाबहार एक्‍टर आणि डांसर मिथुन चक्रवर्ती बद्दलचा हा किस्सा सध्या चर्चेत आहे. हा किस्सा आहे अश्या मुलीला दत्तक घेण्याचा जी त्यांना एका कचराकुंडी जवळ मिळाली होती.

मिथुन चक्रवर्ती यांनी कचराकुंडी जवळ मुलीला दत्तक घेतले

मिथुन यांनी त्यामुलीला आपल्या मुली प्रमाणे मोठे केले आणि तिचे नाव दिशानी ठेवले. दिशानी अनेक वर्षा पूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्या जवळ मिळाली होती. ती आता अतिक्षय सुंदर दिसते. असे बोलले जाते कि दिशानी जेथे कचराकुंडी जवळ पडलेली होती तेथुन जाणारे लोक त्यामुलीला एखाद्या सरकारी किंवा गैर सरकारी संस्थेला देण्याची चर्चा करत होते. एका कचराकुंडी जवळ सोडलेली ती मुलगी अत्यंत कमजोर स्थिती मध्ये होती आणि सतत रडत होती. मिथुन यांना हि गोष्ट समजली आणि त्यांनी तिचा स्वीकार केला आणि आपले नाव दिले. मिथुन चक्रवर्ती यांनी या मुलीला दत्तक घेतले.

जेव्हा मिथुन यांनी दिशानीला स्वीकारण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची पत्नी योगिता बाली यांनी देखील या चांगल्या कार्यात त्यांना पूर्ण पाठींबा दिला. असे बोलले जाते कि योगिता त्यामुलीला आपल्या जवळ घेण्यासाठी उत्सुक होती त्यासाठी त्यांनी पूर्ण रात्र कागदी कार्यवाही करण्यासाठी धावपळ केली. त्यानंतर मुलीला घरी आणले गेले आणि मुलीला दिशानी नाव दिले गेले. तेव्हा पासून दिशानीला एका स्टार डॉटर प्रमाणे वाढवले गेले आहे.

लवकरच होऊ शकते बॉलीवूड मध्ये एन्ट्री

दिशानी इतर स्टार किड प्रमाणे प्रकाश झोता मध्ये आलेली आहे. दिशानी सोशल मिडीयावर अत्यंत एक्टीव असते आणि तिच्या फॉलोअर्सची संख्या चांगली आहे.

इतर स्टार किड प्रमाणे दिशानीचे इंस्ताग्राम देखील फ्रेंड्स आणि पार्टीच्या फोटोने भरलेले असते. ती बऱ्याच वेळा आपले फोटो सोशल मिडियावर शेयर करते. मिथुन आणि योगिताचे चार आपत्य आहेत त्यामध्ये 3 मुले महाक्षय, उश्मे, नमाशी चक्रवर्ती आणि 1 मुलगी दिशानी चक्रवर्ती आहे जिला मिथुन यांनी दत्तक घेतले होते.

अश्या बातम्या आहेत कि लवकरच दिशानी बॉलीवूड मध्ये डेब्यू करणार आहे. दिशानीने न्यूयॉर्क फिल्म अकेडमी मधून एक्टिंग कोर्स देखील केला आहे. मिथुनची हि मुलगी आता मोठी झालेली आणि सुंदर दिसत आहे.

कफ झाल्यास करा हे घरगुती उपाय

या 4 नावाच्या मुलींचा क्रोध असतो सगळ्यात भयंकर, यांच्या सोबत पंगा घेण्या अगोदर एकदा पुन्हा विचार करा