in

संपूर्ण दिवस मुकेश अंबानी काय करतात जाणून घ्या…

देशातील श्रीमंत लोकांच्या बद्दल बोलायचे झाले तर सगळ्यात पहिला क्रमांक अंबानी परिवाराचा लागतो. तुम्हाला माहित असेलच कि देशातील सगळ्यात श्रीमंत कुटुंबामधील एक अंबानी कुटुंब आहे. येथे आपण मुकेश अंबानी बद्दल बोलत आहोत यांचा जन्म 19 एप्रिल 1957 मध्ये यमन मध्ये झाला होता. हे एक भारतीय व्यावसायिक आहेत आणि फोर्ब्सच्या सूची अनुसार ऑगस्ट 2016 मध्ये जवळपास 22.2 अरब डॉलरच्या संपत्तीसह जगातील सगळ्यात श्रीमंत लोकांच्या यादीत 36 व्या क्रमांकावर होते. आज आपण यांच्या दिनचर्या बद्दल जाणून घेऊ.

आज मुकेश अंबानी हे नाव प्रत्येकाला माहित आहे. त्यांनी आपल्या मेहनतीने हे स्थान मिळवले आहे, त्यांच्या सारखी लाइफस्टाइल प्रत्येकाला हवीहवीशी आहे. त्यांनी नुकताच आपला 61 वा वाढदिवस साजरा केला. तुमच्या माहितीसाठी त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांनी मुकेश अंबानी यांना अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. ज्यांच्या मदतीने आज ते देशातीलच नाही तर जगातील देखील यशस्वी लोकांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.

त्यांच्या दिनचर्या बद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजता होते. सकाळी 5 वाजता उठल्यावर सगळ्यात पहिले ते आपल्या पर्सनल जिम मध्ये जातात. तेथे ते वर्कआउट करतात. त्यानंतर ते तेथेच चहा घेतात आणि सोबत न्यूज पेपर वाचन करतात. त्यानंतर ते आपल्या पुढील दिनचर्या करतात.

मुकेश सकाळी 6 ते 7.30 दरम्यान स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग करतात, त्यानंतर ते नाश्ता करतात, नाश्त्या मध्ये ते पपईचा ज्यूस, दलिया किंवा दही सोबत पोळी घेणे पसंत करतात. तर रविवारी ते इडली सांभार खाणे पसंत करतात.

सकाळी 9 ते 10 दरम्यान ते एंटीलाच्या 14 व्या मजल्यावर असतात, येथे त्यांचे घर आहे, जेथून ते ऑफिससाठी तयार होतात. ते आपल्या सोबत ऑफिस बैग,लैपटॉप आणि ऑफिस मध्ये आवश्यक असलेल्या वस्तू सोबत घेतात. ते नेहमीच घरातून निघण्या अगोदर आई, पत्नी आणि मुलांच्या सोबत काही वेळ घालवतात.

मुकेश अंबानी ऑफिस मध्ये जाण्या अगोदर घरातील 21 व्या फ्लोरवर जाऊन आपल्या पर्सनल ऑफिस मध्ये जाऊन काही आवश्यक फाईल्स कलेक्ट करतात आणि जवळपास दहा वाजता नरीमन पॉइंट येथील आपल्या हेड ऑफिस मध्ये जातात.

अंबानी रात्री जवळपास 11 वाजता घरी परत येतात. त्यानंतर ते एंटीला मधील 19 व्या फ्लोरवर आपल्या रूम मध्ये चेंज करतात आणि त्यानंतर 11 ते 12 च्या दरम्यान 19 व्या फ्लॉरवर पत्नी नीता अंबानी सोबत घालवतात. तेथे ते दोघे डिनर घेतात.

भेटा बॉलीवूडच्या या अभिनेत्रींना ज्यांचे वय लहान आहे, पण जलवे पाहून कोणीही प्रेमात पडेल

आमिर 5’4″ तर काजोल 5 फुट 3 इंच उंच आहे, जाणून घ्या तुमच्या आवडत्या इतर स्टार्सची उंची किती आहे