आयपीएल 2020: युवराज सिंगने देवदत्त पडीकक्कलला दिले हे चैलेंज

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकला

आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून फलंदाजी करणाऱ्या देवदत्त पडीक्कलने या वेळी आयपीएलमध्ये जबरदस्त फलंदाजी केली आहे. त्याने सलग चार सामन्यात अर्धशतक ठोकले. देवदत्त पडिकक्कलने 45 चेंडूत 63 धावा फटकावल्या. यानंतर अनेक बड्या क्रिकेटर्सनीही त्याचे कौतुक केले आहे. शेवटच्या दिवशी पडिकक्कलने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 63 धावांची जोरदार खेळी केली, त्यामुळे आरसीबी विजयी झाला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने यापूर्वी विकेट गमावल्या होत्या, परंतु कर्णधार विराट कोहलीसह पाडीक्कलने 99 धावांची भागीदारी पूर्ण केली. यानंतर संघ जिंकण्याची खात्री होती. एवढेच नव्हे तर दोन्ही खेळाडूंनी अर्धशतकही पूर्ण केले. विराट कोहली 72 धावा पूर्ण केल्या आणि तो नाबाद राहिला.

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकला

नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने २० षटकांत 6 विकेट गमावत 154 रन केले यानंतर आरसीबी ने 19.5 ओव्हर मध्ये 2 विकेट गमावत 158 रन केले. त्यानंतर आरसीबीने हा सामना 8 गडी राखून जिंकला. या विजयानंतर युवराज सिंगने ट्विटरवर दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले.

हा डाव खेळल्यानंतर माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनेही एक ट्विट केले आहे, या ट्विटमध्ये त्यांनी देवदत्त पद्यक्कल बद्दल पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये युवराज सिंगने दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले आणि त्यांचे कौतुकही केले. यावर पडीक्कल ने उत्तर दिले आहे.

युवराज सिंग यांनी कौतुक केले

ट्विट मध्ये युवराज सिंगने लिहिले की, “मी गेल्या 8 वर्षांत विराट कोहलीला कधीही फॉर्मच्या बाहेर पाहिले नाही, जे आश्चर्यचकित करणारे आहे. फॉर्म तात्पुरता आहे, परंतु क्लास पर्मनंट असतो”.

पडिक्क्कलचे कौतुक करताना त्यांनी असे लिहिले की, “पडिक्क्कल खरंच खूप चांगली फलंदाजी करतो आणि त्याच्याबरोबर फलंदाजी करताना पाहावे लागेल की कोण सर्वात जास्त शॉर्ट मारतो”.

देवदत्त पडिकक्कल ने दिलं शानदार उत्तर

युवराज सिंगच्या ट्विटला उत्तर देताना देवदत्त पडीक्कल यांनी ट्विटरवर एक पोस्ट केले. त्यांनी लिहिले की, “पाजी तुमच्याशी माझा काही सामना नाही. मला नेहमीच तुमच्याबरोबर फलंदाजी करायची इच्छा होती, तर चला करूया”.

You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More