तुमचे PAN Card लिंक आहे की नाही? असे चेक करा स्टेटस नाहीतर होईल त्रास

पॅन-आधार लिंक आहे की नाही ते पुढील प्रमाणे तपासा

तुम्ही जर आधारशी पॅन लिंक केले असेल, तर तुम्ही घरी बसूनही पॅन कार्ड सक्रिय आहे की नाही हे माहिती करून घेऊ शकता.

1. हे तपासण्यासाठी तुम्ही आयकर विभागाच्या Incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा.

2. आता (Know your PAN) च्या पर्यायावर क्लिक करा, यामध्ये तुम्हाला काही माहिती विचारली जाते, ती तुम्हाला ते भरावी लागेल.

3. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. त्यानंतर तुम्हाला OTP सबमिट करावा लागेल.

4. यानंतर, तुमचे पॅन कार्ड सक्रिय आहे की नाही हे रिमार्कमध्ये लिहिले जाईल.

तुम्ही SMS ने लिंकिंगची स्थिती देखील तपासू शकता.

तुम्ही तुमचा पॅन लिंक आहे की नाही हे SMS द्वारे देखील तपासू शकता.

1. मेसेज बॉक्समध्ये IDPAN < 12 अंकी आधार क्रमांक> < 10 अंकी पॅन कार्ड क्रमांक टाइप करा.

2. यानंतर 567678 किंवा 56161 वर मेसेज पाठवा.

3. तुमच्याकडे पॅन-आधार लिंक असल्यास, तुम्हाला स्क्रीनवर हा संदेश मिळेल. “Aadhaar…is already associated with PAN (number) in ITD database. Thank you for using our services.”

4. जर पॅन-आधार लिंक नसेल, तर तुम्हाला हा मेसेज स्क्रीनवर मिळेल. “Aadhaar…is not associated with PAN (number) in ITD database.”