in

हात थरथर कापण्याचे कारण काय असते

आयुर्वेदाने वाताच्या बिघाडामुळे होणारे असे काही आजार सांगितले आहेत. कंपवात हाआयुर्वेदाने वाताच्या बिघाडामुळे होणारे असे काही आजार सांगितले आहेत. कंपवात हा त्यापैकीच एक विकार. हात, पाय कंप पावणे म्हणजे थरथरणे या स्वरूपात आढळणारा हा आजार कधी सौम्य तर कधी तीव्र ये त्रास देतो.

लिहितां हात कापणे, एकादी वस्तू पकडली असंताना हात कापतो. चहाचा कप नीट स्तिर धरता न येणे, परिक्षाचे वेळी किंवा इंटरव्यूच्या वेळी मानसिक तणावामुळे किंवा भीतीमुळे हातातील कागदपत्र इत्यादी वस्तू कापणे. अति राग किंवा चीड आल्याने, भांडणाच्यावेळी हातपाय कापणे, रात्रीच्या वेळी घाबरल्यामुळे देखील अंग कापणारे अनेकजण असतात. अतिमद्य पानाच्या परिणामी हात पाय कापतात. तसेच नियमित मद्यपान घेणाऱ्यांनी अचानक मध्येच बंद केल्याने देखील हातपाय कापू लागतात.

थोडक्यात मानसिक कारणे आणि कंपवात यांचा अगदी निकटचा संबंध आहे. ‘कापरे भरणे’ किंवा ‘थरकाप उडणे’ हे वाक्य प्रचार देखील त्यामुळे प्रचलित झाले आहेत. मोठ्या आजारांवर आलेल्या तीव्र अशक्तपणामुळे देखील हात पाय कापतात. रक्तदाब वाढल्यामुळे देखील अंग कापते. अति कष्टांच्या कामानंतर थकवा आल्यानंतर देखील परत काम करतानासुद्धा हात पाय कापतात. तीव्र भीती, चिंता काळजी यांची तीव्रता जास्त असल्यास निर्माण होणाऱ्या तात्पुरत्या स्वरूपाचा कंप हा विकृती असत नाही, पण अतिशय क्षुल्लक चिंता, काळजी किंवा भीतीमुळे जर कंप निर्माण असेल तर मात्र अश्या वेळी उपचारांची निश्चित गरज असते.

वार्धक्यातील शरीरातील ‘वात’ जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि स्नायूं नाड्या यांचे बलदेखील कमी झालेले असते. परिणामी काही लोकांमध्ये हात, पाय आणि डोके या तिन्ही ठिकाणी कंप हे लक्षण आढळते. काहीवेळा हा कंप एवढा जास्त असतो की माणूस मी स्थिर चालू देखील शकत नाही. पार्किसन्सच्या विकारामध्ये आणि लहान मेंदूमधील दोष, शिरोमीगात यांच्या परिणामदेखील कंपवात हा विकार आढळून येतो.

लेखनिकाचा कंप कंपवाताशी साधारण साधर्म्य असणारा हा एक विकार आहे. सततचे लिखाण करणारे तसेच सतत चे पैसे मोजण्याचे काम करणारे कॅशियर्स यांच्या बोटावर येणाऱ्या सततच्या ताणामुळे लिहायला सुरुवात केल्यानंतर बोटे दुखू लागतात. कोपरापासून हातही दुखू लागतो. लिहण्याचा वेग मंदावतो, लिहण्याचा वेग मंदावतो पेण धरण्यासाठी अतिरिक्त ताकद लावावी लागते. लिहिताना काही वेळा मध्ये थांबावे लागते.

प्राथमिक स्वरूपात अशा लक्षणांनी सुरू होणाऱ्या या विकारात काही काळानंतर हातातल्या वेदना जास्तच जाणवतात. अक्षरांचे वळण बिघडते, लिहिण्याची क्षमता व वेग मंदावतो, लिहणाच्या जोडीला पेन धरण्यासाठी देखील जादा ताकद लावावी लागते आणि नंतर पुढच्या अवस्थेत बोटातील ताकद अनाकीनच कमी झाल्याने पेन धरताही येत नाही.

थंडी मध्ये होणाऱ्या आजारावर उपाय