Mobile Phones

पंच-होल कैमेरा सह विवो चा नवीन फोन लवकरच भारतामध्ये लॉन्च होईल

Vivo लवकरच भारतामध्ये आपली Z-सिरीज लॉन्च करणार आहे. कंपनी या सीरिजच्या लॉन्चसाठी काही काळापासून टीज करत आहे आणि आता कंपनी ने ट्विटरवर पोस्ट केली आहे. टीजर पोस्टर मध्ये ब्रीज़, ज़िगज़ैग, पज़ल, होरिज़ोन इत्यादी लिहिले आहे. परंतु सगळ्या शब्दातून Z अक्षर गायब आहे. कंपनी ने आपल्या ट्विटर अकाउंटच्या हेडर इमेज मध्ये एक मोठा Z लिहिला आहे ज्यामुळे संकेत मिळतो कि लवकरच कंपनी भारता मध्ये आपली Z सिरीज लॉन्च करू शकते.

आपल्या माहितीसाठी कंपनीने हल्लीच चीन मध्ये आपला Vivo Z5x मोबाईल फोन लॉन्च केला होता ज्यास कंपनी भारतामध्ये घेऊन येण्याची तयारी करत आहे. हे डिवाइस औरोरा, एक्सट्रीम नाईट ब्लैक आणि फैंटम ब्लैक पर्यायात उपलब्ध आहे.

Vivo Z5x च्या खास फीचर्स मध्ये याचे पंच-होल डिस्प्ले, ट्रिपल रियर कैमेरा, क्वालकॉम स्नैपड्रैगन 710 प्रोसेसर, 5,000mAh बैटरी आणि एंड्राइड 9.0 पाई OS आहे. स्मार्टफोन स्नैपड्रैगन 710 ओक्टा-कोर SoC द्वारा संचालित आहे. डिवाइस मध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी माइक्रो एसडी कार्ड स्लॉट दिला आहे ज्यामुळे 256 GB पर्यंत स्टोरेज वाढवणे शक्य आहे.

Vivo Z5x एंडरोइड 9 पाई वर आधारित फनटच OS 9 वर काम  करते.डिवाइस मध्ये 6.33 इंच चा फुल HD+ डिस्प्ले दिलेले आहे ज्याचे रिजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे.

कैमेरा सेटअप बद्दल बोलायचे झाले तर डिवाइसच्या बैक वर OS 9 वर एक 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे ज्याचे अपर्चर f/1.78 आहे, दुसरा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल कैमेरा आहे आणि याचे अपर्चर f/2.2 आहे तिसरा कैमेरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे ज्याचे अपर्चर f/2.4 आहे. डिवाइसच्या फ्रंटवर एक 16 मेगापिक्सलचा सेल्फी कैमेरा दिलेला आहे आणि फोन मध्ये 5,000mAh ची बैटरी मिळत आहे. कनैक्टीविटी बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये ड्यूल सिम, Wi-Fi, ब्लुटूथ, GPS, 4G LTE इत्यादी समाविष्ट आहे आणि सिक्युरिटीसाठी डिवाइस मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिलेल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button