Tech

काय तुम्ही अजूनही मोबाईल चुकीच्या पध्द्तीने चार्जिंग करता? जाणून घ्या योग्य पध्द्त

आजच्या युगा मध्ये स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला आहे. इतर गैजेटसच्या तुलनेत आपण सगळ्यात जास्त स्मार्टफोनचा वापर करतो. स्मार्टफोनच्या वापरामुळे कैमेरा आणि म्युजिक प्लेयर, घड्याळ इत्यादी गैजेटसचा वापर कमी केलेला आहे. परंतु स्मार्टफोन सोबत सगळ्यात मोठी समस्या आहे ती म्हणजे चार्जिंग. स्मार्टफोन चार्ज संबंधामध्ये आपल्या हे माहित नाही कि यास चार्ज करण्याची योग्य पद्धत काय आहे.

स्मार्टफोनचा वापर आपण अनेक कामांच्यासाठी करतो. त्यामुळे स्मार्टफोन सोबत सगळ्यात मोठी समस्या होते ती म्हणजे त्याची चार्जिंग बद्दल. पण आता काही कंपन्या काही स्मार्टफोन मध्ये मोठ्या आणि चांगल्या बैटरी देत आहेत. परतू तरीही आपण यागोष्टीला नकार नाही देऊ शकत कि आपल्याला फोन चार्ज करायचा आहे. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु आपण फोनला चुकीच्या पद्धतीने चार्ज करतो.

फोन कधीही एका वेळेस फुल चार्ज करू नये

नेहमी आपल्या फोनला थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने चार्ज करा. फोन कधीही एकदाच चार्जिंगला लावून फुल चार्ज करू नये. सगळ्या स्मार्टफोन मध्ये लिथियम बैटरी असते ज्यास तुकड्या तुकड्या मध्ये चार्ज करावे. खरतर हा गैरसमज आहे कि बैटरीला एकाच वेळी फुल चार्ज करणे चांगले असते.

बैटरी कधीही 100 % चार्ज करू नये

कधीही बैटरी शंभर टक्के चार्ज करू नये. यामुळे बैटरी लवकर खराब होते आणि फुटण्याची भीती वाढते. बैटरी 100 टक्के चार्ज करण्या पेक्षा 90 ते 95 टक्के दरम्यान चार्ज करावे.

बैटरी रात्रभर चार्जिंगला ठेवू नये

जास्त वेळ चार्जिंग केल्यामुळे बैटरीची लाइफ कमी होते. यासाठी बैटरी कधीही रात्रभर चार्ज करण्यास ठेवू नये. आपल्या पैकी अनेक लोकांना फोन रात्रभर चार्ज करण्याची सवय असते, पण असे केले नाही पाहिजे.

फोन कधीही कवर सोबत चार्ज करू नये

जर आपल्या फोनला कवर लावलेले असेल तर ते काढून नंतर चार्जिंग करावी. कारण कवर सह चार्जिंगला लावल्यावर बैटरी गरम होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते, ज्याचे परिणाम हानिकारक होऊ शकतात. यासाठी वेगाने चार्ज होण्यासाठी आणि बैटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी आपल्या स्मार्टफोनला चार्जिंगला लावण्याच्या अगोदर त्याचे कवर काढून चार्जिंगला लावावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button